हिंगोली बसस्थानकामधील एसटी बसेसच्या जागा व्यापली खासगी वाहनांनी | पुढारी

हिंगोली बसस्थानकामधील एसटी बसेसच्या जागा व्यापली खासगी वाहनांनी

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा

गेल्या महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने हिंगोली बसस्थानकमध्ये महिन्याभरापासून एकही एसटी आलेली नाही. त्यामुळे एसटीची जागा खासगी वाहनांनी घेतल्याचे दिसून येते. संपामुळे प्रवासी खासगी वाहनातून प्रवास करत आहेत. एरवी खासगी वाहनांबाबत तिरस्कार असणाऱ्या एसटी परिवहन खात्याला आता खासगी वाहनांनाच बस स्थानकात आश्रय देण्याची वेळ आली आहे.

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे एसटीचे उत्पन्न बुडते म्हणून नेहमी खासगी वाहनचालकांचा तिरस्कार करणाऱ्या एसटी महामंडळाला खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागल्याचे दिसून येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप पूर्णपणे मिटला नसल्याने, तसेच प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता एसटी प्रशासनाने आपल्या बस स्थानकातील बसेसची जागा खासगी वाहनांना दिल्याचे दिसून येते. त्यामुळे या बसस्थानकात लालपरी कधी उभी राहणार, याकडे प्रवाशांसह एसटी महामंडळाचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button