बीड: बोरगाव येथे वर्चस्व वादातून वाळू माफियांच्या दोन गटांत राडा

बीड: बोरगाव येथे वर्चस्व वादातून वाळू माफियांच्या दोन गटांत राडा

गेवराई, पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील बोरगाव परिसरात रात्री अचानक जाधव आणि ढाकणे गटात वाळूच्या कारणावरून तूफान राडा झाल्याची घटना (25 मे ) रोजी रात्री घडली असून या घटनेत सहाजन गंभीर जखमी असल्याची माहिती असून त्यांच्यावर बीड व संभाजी नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चकलांबा पोलिस ठाणे अंतर्गत बोरगाव बु. परिसरात गोदापात्र आहे. बोरगाव हे गेवराई तालुक्याच्या हद्दीत आहे. पलीकडे नगर जिल्हा आहे. नेहमीच मुंगी येथील वाळू माफिया या परिसरात दहशत माजवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. परंतु, याबाबत कधी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वाळू उपसावरून गावातील जाधव आणि मंगी येथील ढाकणे गटात वर्चस्ववादातून तूफान हाणामारी झाली. तसेच या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच रोडवर मोटार सायकलही जाळण्यात आल्या आहेत. अद्याप तरी या प्रकरणी चकलांबा पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news