बीड : मासेमारी करताना तरुणाचा बुडून मृत्यू; दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला | पुढारी

बीड : मासेमारी करताना तरुणाचा बुडून मृत्यू; दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

गौतम बचुटे/केज : केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे तलावात मासे पकडायला गेलेल्या एका (३४) वर्षीय तरुणाचा जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता मृतदेह सापडलेला नव्हता. दरम्यान दुसऱ्या दिवशी परळी येथील रेस्कयू टीमला त्याचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील नितीन मच्छिंद्र काळे (वय ३४ वर्षे) हा तरुण मुंबई येथे राहत असून काही दिवसांपूर्वी तो धार्मिक कार्यासाठी गावात आला होता. त्या नंतर गुरुवार दि. २३ मे रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास तो जिवाचीवाडी येथील गावालगतच्या तलावात मासे धरण्यासाठी गेला होता, मात्र त्याला पाण्याचा आणि मासेमारीसाठी तळ्यात टाकलेल्या जाळ्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशाने पोलीस नाईक राजवीर वंजारे आणि पोलीस नाही शमीम पाशा हे घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी स्थानिक गावकरी व मच्छीमारांच्या साह्याने मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र सायंकाळी अंधार असल्यामुळे मृतदेहाचा शोध लागला नाही.

मृतदेहाचा शोध घेण्यासाठी परळी येथून अग्निशामक दलाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र रात्री अंधार असल्यामुळे शोध कार्य थांबविले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. दि. २४ मे रोजी (शुक्रवार) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास रेस्कयू टीमला नितीन काळे याचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले. मृतदेह पाण्याबाहेर काढला असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात हलविला आहे.

हेही वाचा : 

Back to top button