हिंगोली: वापटी येथे चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

हिंगोली: वापटी येथे चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: वसमत तालुक्यातील वापटी येथे किरकोळ कारणावरून चुलत भावाचा लाकडी दांडक्‍याने मारहाण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय वसमतच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश जयंत राजे यांनी गुरुवारी दिला आहे.

वसमत तालुक्यातील वापटी येथील विकास बाबुराव शिंदे यांचा त्यांचा चुलत भाऊ अमोल उर्फ हरीभाऊ लक्ष्मण शिंदे याच्यासोबत २ जुलै २०२१ रोजी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शाब्दीक चकमकीनंतर वाद वाढत गेल्यानंतर अमोल याने विकास यास लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत विकास यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी कुरुंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अमोल याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

कुरुंदा पोलिस ठाण्यााचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या पथकाने अधिक तपास करून वसमतच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. या प्रकरणात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी अमोल उर्फ हरीभाऊ शिंदे यास खून प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेप व ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. संतोष दासरे यांनी काम पाहिले. त्यांना अतिरिक्त सरकारी वकील ॲड. एन. एच. नायक, कुरुंदा पोलिस ठाण्याच्या जमादार द्वारका सोनटक्के यांनी सहकार्य केले.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news