Nanded Accident News : अर्धापुरात एसटी बस- ट्रकचा भीषण अपघात; २१ जण जखमी

नांदेड- अर्धापूर अपघात
नांदेड- अर्धापूर अपघात

अर्धापूर, पुढारी वृत्तसेवा :  शहरातील अर्धापूर – हिंगोली रस्त्यावरील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या समोर विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने एसटी बसला धडक दिली. या अपघातात २१ जण जखमी झाले. तर ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवारी (दि. ३०) दुपारी तीनच्या सुमारास घडली. जखमींवर अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर गंभीर जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Nanded Accident News

महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांदेड बसस्थानकातून नांदेड सावरगाव ही बस आज दुपारी २५ प्रवासी घेऊन सावरगावला निघाली होती. ही बस अर्धापूर शहरातील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या समोर आली. यावेळी हिंगोलीकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात ट्रक चालक राकेश लवंशी (वय ४२, रा. धार, मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला. Nanded Accident News

या अपघातात संजय बालाजी मुळेकर (वय ४८, रा सावरगाव), दिलीप कोंडीबा तारू (वय ३०, रा. चाभरा), कोंडीबा गुणाजी तारु (वय ४२, रा. चाभरा), विलास दत्ताप्पा शेवाळकर (वय ५१, रा. चाभरा), बबन गणपती गारोळे (वय ४२, सावरगाव), बालाजी पिराजी धोंगडे (वय ६४, रा. निमगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर भूजंग राजेंद्र गादेकर (वय ४१, रा. सावरगाव), मारोती सखाराम गादेकर (वय ६०, रा. सावरगाव), गुलाब मारोती राठोड (वय ७५), गोदावरी रामा नरवाडे (वय ४६) सारजाबाई उत्तम सुर्यवंशी (वय ६०), सिताबाई रामा ढगे (वय ३५), यशवंत विक्रम जोगदळे (वय ७५), बळीराम पुंजाजी मिरागे (वय ५०), फुलाजी बालाजी दांडेगावकर (वय २६),अंकिता चंद्रकांत सोनाळे (वय १९), इंदुबाई दत्तराव तरटे (वय ६२), विश्वास गुलाबराव जाधव (वय ५०), प्रमोद गणपतराव जोंधळे (वय ४४), श्यामराव किशनराव आडकिने (वय ७५), मारोती घनश्याम बिचकुंदे (वय ७६) हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच वसमतफाटा महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेख नईम, जमादार सचिन खेडेकर, श्रीवास्तव,डवरे, डुकरे घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news