नांदेड-देगलूर मार्गावर ट्रक, २ कारचा विचित्र अपघात; ७ जण गंभीर जखमी

नांदेड-देगलूर मार्गावर ट्रक, २ कारचा विचित्र अपघात; ७ जण गंभीर जखमी

शंकरनगर: पुढारी वृत्तसेवा : नांदेड-देगलूर राज्य महामार्गावर ट्रक व दोन कारचा विचित्र अपघात होऊन ७ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि. २७)  सायंकाळी ५ च्या सुमारास टाकळी (ता. बिलीली) शिवारात  घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेडकडून देगलूरकडे जाणारा ( आर.जे.14 जी. एच.6786) ट्रक व देगलूरकडून नांदेडकडे जाणारी कार (एम.एच.26- ए.एफ.8808) आणि (एम.एच.19-बीजे 7913) या कारचा टाकळी येथील पुलाच्या अलीकडे विचित्र अपघात झाला.
या अपघातात दमनदीप सींग मरवाह (वय 34 रा.छतीसगढ), मनदिपसिग बेधारी (वय 45, पंजाब), जगजीतसींग मरवाह ( वय 50, रा. छत्तीसगड), गुरदीपसींग बलजितसींग (वय 50, रा. विशाखापटनम), सोनिसींग तमन्ना (रा. 40 रा.नांदेड), हरजीतसींग ( वय17 रा. दिल्ली), मनप्रितसींग कुलदीपसींग (वय 46, रा.दिल्ली) हे गंभीर जखमी झाले. त्यांना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news