नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील अज्ञात वाहनाच्या धडकेत डोंगरकडा फाटाच्या तरुणाचा मृत्यू | पुढारी

नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील अज्ञात वाहनाच्या धडकेत डोंगरकडा फाटाच्या तरुणाचा मृत्यू

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील भाटेगाव शिवारातील पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत डोंगरकडा फाटा येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शेख ईसाक शेख पासुमियाँ(वय ३४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

शेख ईसाक शेख पासुमियाँ(वय ३४ वर्षे रा. सावरगाव ता. हदगाव जि. नांदेड) येथील रहिवासी असून बांधकाम मिस्त्रीचे काम करतात. ते बांधकाम करून भाटेगाव येथून डोंगरकडा फाटाकडे पाई चालत येत असताना पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये शेख ईसाक शेख पासुमियाँ यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची घटना समजताच बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींनवार, शिवाजी पवार ,शाहिद शेख,रोहिदास राठोड व डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार नागोराव बाभळे, गजानन सरकटे हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शेवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या अपघातातील सदरील वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून त्या वाहनाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button