हिंगोली: भाविकांच्या अलोट गर्दीत नागनाथांचा रथोत्सव उत्साहात

हिंगोली: भाविकांच्या अलोट गर्दीत नागनाथांचा रथोत्सव उत्साहात

औंढा नागनाथः पुढारी वृत्तसेवा : हर हर महादेव, बम बम भोले, नागनाथ महाराज की जप'च्या जयघोषामध्ये सोमवारी ( दि.११) रात्री महाशिवरात्री यात्रेनिमित्त नागनाथ मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा झाला.

महाशिवरात्रीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणारा रथोत्सव असल्याने दुपारपासूनच हजारो भाविकांची गर्दी केली होती. फुलांच्या माळा आणि दिव्यांद्वारे सजावट केलेल्या रथामध्ये श्री नागनाथांची उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती. रात्री दहाच्या सुमारास मंदिराभोवती रथाच्या प्रदक्षिणेला सुरवात झाली. अशा पाच प्रदक्षिणा झाल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव, ओम नमः शिवाय, नागनाथ महाराज की जय, बम बम भोलेचा गजर केला. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, देवस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांच्या हस्ते 'श्रीं' ची पूजा झाली.

उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, नगराध्यक्षा सपना प्रदीप कनकुटे, उपनगराध्यक्ष दिलीपकुमार राठोड यांच्यासह विश्वस्त अॅड. शिवशंकर वाबळे, देवस्थानचे अधीक्षक वैजेनाथ पवार, व्यवस्थापक सुरेद्र डफळ, मुख्य पुजारी तुळजादास भोपी, हरीहर भोपी, गार्ड प्रमुख बबन सोनुने, रामेश्वर गुरव, नागेश गोरे, नागनाथ गुरव, रमेश क्षीरसागर आदींसह जवळपास दोन लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते. पोलीस अध्यक्ष जी. श्रीधर, अप्पर पोलीस अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणपत राहिले यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news