हिंगोली: वारंगा फाटा येथील ५ दुकानांना आग लागून ११ लाखांचे नुकसान | पुढारी

हिंगोली: वारंगा फाटा येथील ५ दुकानांना आग लागून ११ लाखांचे नुकसान

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा: कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे शनिवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. या आगीत वारंगा – बाळापूर रस्त्यालगत असलेल्या मोबाईल शॉपी, भंगार दुकान, टेलरींग दुकान, दवाखान्यातील साहित्य जाळून सुमारे ११ लाखांचे नुकसान झाले. या आगीचे अद्याप कारण समजू शकलेले नाही.

दुकानांना आग लागल्याची माहिची मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. शेजारील बोअरवेलमधून पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीने रुद्ररूप धारण केले होते. दुकानांतील साहित्य नागरिकांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठे नुकसान टळले.

शेख सलीम, राजेश्वर पतंगे यांनी कळमनुरी येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत सर्व साहित्य जाळून खाक झाले होते. या आगीत शेख निजाम शेख फकिरसाब यांच्या भंगार दुकान व गोडाऊनचे ४ लाख, डॉ, प्रदीप नरवाडे यांच्या दवाखाण्याचे ४ लाख, हणमंतराव नारायण सोनाळे यांच्या टेलरींग दुकानाचे ८० हजार आणि मोबाईल शॉपीचे अंदाजे अडीच लाखांचे नुकसान झाले. घटनास्थळाचा मंडळ अधिकारी, पी. ए. काकडे व तलाठी बी.के. मोरे यांनी पंचनामा केला.

हेही वाचा 

Back to top button