परभणी: लोकसभेसाठी पाथरीतील प्रत्येक गावातून २ उमेदवार उभे करणार; मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय | पुढारी

परभणी: लोकसभेसाठी पाथरीतील प्रत्येक गावातून २ उमेदवार उभे करणार; मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

पाथरी, पुढारी वृत्तसेवा: शासन सगसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करत नसल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून मराठा समाजाचे दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय पाथरी तालुका सकल मराठा समाजाने घेतला आहे. हनुमान मंदिरामध्ये आज (दि. ९) झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

यावेळी बैठकीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन मराठा उमेदवार उभे करणे, राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात यावी, असे एकमताने ठराव संमत करण्यात आला. लोकसभेसाठी उमेदवार उभे करताना अनामत रक्कम व इतर खर्च करण्यासाठी गावागावातून वर्गणी गोळा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी होईपर्यंत मराठा समाजातील बांधवांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत केवळ समाजाचा व्यक्ती म्हणून राहावे, अशी भूमिका घेण्यात आली. त्यासाठी राजकीय नेत्यांना गावात व घरी येण्यास बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मराठा समाजाने कामाला लागण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button