

पूर्णा: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील शिरकळस शेत शिवारात नवीन विहिरीचे खोदकाम चालू असताना डोक्यात दगड लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. पार्थ दुष्यांत भोसले (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे शिरकळस गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरकळस येथील शेतकरी श्यामराव भोसले यांच्या शेतात नवीन विहिरीचे खोदकाम चालू होते. मृत पार्थ हा परभणी येथील एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होता. तो सुटी असल्याने गावी आला होता. तो शेतात गेला असता शेजारी चालू असलेल्या विहीर खोदकामाजवळ येताच त्यास ब्लास्टिंगमधून उडालेला दगड लागला. सदाशिवराव भोसले यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. घटनास्थळी सपोनि कपील शेळके, पोउनि गजानन काठेवाडे, पोहे बडे यांनी धाव घेवून तपासणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली आहे.
हेही वाचा