

पूर्णा: पुढारी वृत्तसेवा : परभणी- पूर्णा लोहमार्गावरील फूकटगाव शिवारातील गायरान भागात दुतोंडी पुलाजवळ आज (दि. ८) दुपारी अडीचच्या सुमारास पूर्णेहून परभणीकडे जाणा-या काचीगुडा मनमाड रेल्वे गाडीच्या धडकेत महिला जागीच ठार झाली. नांदेड जिल्ह्यातील एकदरा येथील जनाबाई हनूमंत आरसुळे वय ( वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दु:खद घटना जागतिक महिला दिनीच घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंगात लाल गुलाबी रंगाची साडी असलेल्या मृत महिलेला रेल्वे इंजिनची जबरदस्त धडक बसताच महिला लांब उडून पुढे दोन्ही लोहमार्ग रुळामध्ये जावून पडली. यात तिचा एक पाय तुटून लांब अंतरावर पडला. तर उर्वरित शरीराचा चेंदामेंदा झाला. फुकटगाव शिवारातील गायरान भाग परिसरातील दुतोंडी पुल येथे नागरिकांनी गर्दी केली होती. या महिलेच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या रेल्वे अपघाताची माहिती मिळताच पूर्णा ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे,पोउनि केंद्रे, बिट जमादार मुजमूले, पोलिस कर्मचारी यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा