

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा शहरातील रेल्वे कॉलनीतील एका घराला आज (दि. ४) दुपारी ३ च्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत घरातील संसारपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले. यावेळी घरात कोणी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. अचानकपणे आग लागल्यानंतर घरातून आगीचे लोळ व धूर दिसताच आजुबाजूच्या नागरिकांनी तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला.
घटनास्थळी अग्निशामक बंब दाखल झाले. कर्मचा-यांनी पाण्याचे फवारे मारुन आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, ही आग कशामुळे लागली? याचे कारण समजू शकलेले नाही. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. याआधी देखील चार दिवसाखाली रेल्वे कॉलनीतील एका जुन्या कार्यालयाला आग लागून आगीत रेल्वे विभागाचे जुनाट कागदपत्रे, कपडे, गाद्या व इतर साहित्य जळाले होते. आता ही दुसरी आगीची घटना घडली आहे.
हेही वाचा