छ. संभाजीनगर: मेहबूबखेडा येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू | पुढारी

छ. संभाजीनगर: मेहबूबखेडा येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

गंगापूर; पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यातील मेहबूबखेडा येथील जुन्या पडक्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने पंचनामा केला. ही घटना मंगळवारी (दि. ५) घडली.  Chh. Sambhajinagar

वनविभागाच्या माहितीनुसार महबूबखेडा येथील शेतकरी श्रीराम नानासाहेब गाजरे यांच्या शेतातील एका जुन्या पडक्या विहिरीमध्ये एक वन्यप्राणी बिबट पडलेला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर विभागाचे वनसंरक्षक धुमाळ, छत्रपती संभाजीनगरच्या उपवनसंरक्षक आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर शंकर कवठे, वन परिमंडळ अधिकारी अनिल पाटील, वनरक्षक. एन. आर. चाथे, एस.जी. शेळके व त्यांच्या पथकाने विहिरीत पडलेला मृत बिबट्यास बाहेर काढले. Chh. Sambhajinagar

पशुधन विकास अधिकारी जी. डी. खताळ, एन. एल. गायकवाड, जे. डी. सावते यांनी शवविच्छेदन केले. वन अधिकारी यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे दहन करण्यात आले.

हेही वाचा 

Back to top button