Farmer suicide : हिंगोलीत शेतकऱ्यांकडून सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न | पुढारी

Farmer suicide : हिंगोलीत शेतकऱ्यांकडून सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न

सेनगाव (जि.हिंगोली) ; पुढारी वृत्तसेवा

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या गावात सर्व शेतकऱ्यांनी नक्षलवादी होण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. विज बिल संपूर्ण माफ करा, त्वरित वीज पुरवठा चालू करा. कर्जमाफीची रक्कम द्या, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा, दिवसा विज पुरवठा द्या. अश्या मागण्या घेउन हे शेतकरी आंदोलन करीत आहेत. (Farmer suicide)

सरकारला या मागण्या मान्य नसतील तर आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

याबाबात वारंवार मागणी करूनही तोडगा निघत नसल्याने आज तोकतोडा गावातील काही शेतकऱ्यांनी गावातील विहिरीत उड्या घेउन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि गावातील नागरिकांनी त्यांना वेळीच विहिरीबाहेर काढले. यावर तोडगा काढण्यासाठी गावात महसूल प्रशासनासह मोठा फौजफाटा दाखल झाला असून, गावकऱ्यासोबत प्रशासनाचे अधिकारी यांनी संबंधीत शेतकऱ्यांशी चर्चा केली. (Farmer suicide)

हे ही वाचा :

Back to top button