परभणी: राजवाडी येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपविले | पुढारी

परभणी: राजवाडी येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपविले

सेलू: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राजवाडी येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाने आपले जीवन संपविले. ही घटना आज (दि. १०) उघडकीस आली. प्रताप शेवाळे (वय २७, रा. राजवाडी) असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर महिती अशी की, राजवाडी येथील प्रताप शेवाळे शासन स्तरावर मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने नैराश्यात होता. यातून त्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले. त्यापूर्वी त्यांने मराठा आरक्षणाबाबत चिठ्ठी लिहिली आहे.

हेही वाचा 

Back to top button