परभणी: सेलुचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश | पुढारी

परभणी: सेलुचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सेलू ,पुढारी वृतसेवा : सेलू्चे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच मुंबईत प्रवेश केला. राष्ट्रवादी भवनात दुपारी साडेचार वाजता आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोराडे यांच्यासह समर्थकांचे स्वागत केले. Vinod Borade

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोराडे यांच्या सोबत माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण, रमेश दौड, सचीन कोरडे, सतीश जाधव, गौतम धापसे, वहिद अन्सारी, बालू झमकडे, शेख कासीम, शेख आयुबभाई, बबन गायकवाड, शेख अन्वर, व्यंकट चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, राजेंद्र झोडगावकर, बालासाहेब सरकाळे, शेख रौफ नासर पठाण आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
पोकळी भरून निघाली.Vinod Borade

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत फारकत घेऊन, भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विजय भांबळे हे तत्काळ अजित पवार गटात सामील होतील, आसा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. मात्र, त्यांनी तातडीने आपण शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून सेलुत अजित पवार गटाची पोकळी तयार झाली होती. ती आज विनोद बोराडे यांच्यामुळे ही पोकळी भरून निघाली आहे. तर भाजप, सेना युतीला बळ मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

Back to top button