हिंगोली : सेनगाव येथे अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी आंदोलन | पुढारी

हिंगोली : सेनगाव येथे अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी आंदोलन

सेनगाव : पुढारी वृत्तसेवा : येथील तहसील परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी मातंग समाजाच्या वतीने आज (दि. ७) बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

सकल मातंग समाजाच्या वतीने आज दुपारी १ च्या सुमारास बोंबाबोंब आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले. अनेक वेळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल न घेण्यात आल्याने निषेध नोंदवत बोंबाबोंब आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी सकल मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी प्रमेश्वर इंगोले, सचिन भैय्या जाधव, श्रीकिसन सोनूने, विलास सुतार, मोहन कांबळे, गणेश सुतार, समाधान जाधव, सचिन सुतार, योगेश कांबळे, गजानन कांबळे, शिवाजी जाधव, शिवाजी सुतार, अमर रनबावळे, सुनील सुतार आदीसह सर्व मातंग समाज उपस्थित होता.

हेही वाचा 

Back to top button