बीड : फुलसांगवीच्या सप्ताहाला मनोज जरांगे – पाटलांची सदिच्छा भेट

बीड : फुलसांगवीच्या सप्ताहाला मनोज जरांगे – पाटलांची सदिच्छा भेट


शिरूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईला लाखोंच्या संख्येने समाज गेला होता. त्यानंतर आरक्षण जाहीर झाले. आता कायद्याची अंमलबजावणी बाकी आहे. येत्या चार-पाच दिवसांत कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, तर त्या कायद्याचे काहीही होऊ दे, मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे – पाटील यांनी मौजे फुलसांगवी येथे बोलून दाखविला.

तालुक्यातील श्री क्षेत्र नारायण गडाला भेट दिल्यानंतर जरांगे – पाटील यांचा ताफा मौजे फुलसांगवी येथे आज (दि.२९) दुपारी २.३० दाखल झाला. श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये ४८ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य स्वरूपात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. यावेळी जरांगे – पाटील यांनी श्री संत वामनभाऊ महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. नगद नारायण महाराज, श्री संत वामनभाऊ महाराज, श्री संत भगवान महाराज, श्री संत निगमानंद महाराज आदी संत -महंतांच्या चरणी मी नतमस्तक होतो. हे व्यासपीठ जातीबद्दल बोलण्याचे व्यासपीठ नाही. मला महाराष्ट्रा मध्ये यासाठी बोलण्यासाठी हजारो व्यासपीठ खुली आहेत. यावेळी मध्ये सप्ताहाच्या मंडपामध्ये हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news