बीड: माजलगाव येथे गावठी पिस्टलसह इम्रान पठाणला अटक | पुढारी

बीड: माजलगाव येथे गावठी पिस्टलसह इम्रान पठाणला अटक

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा: आझादनगर भागात अवैध अग्निशस्त्र बाळगणारा इम्रान जबी पठाण (रा.आझादनगर, माजलगाव) यास बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (दि. २७) अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतुस असा ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहाय्यक फौजदार हनुमान खेडकर यांना गुप्त बातमीदारामार्फत इम्रान जबी पठाण याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्टल, कटटा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्दर्शनाखाली पथकाने मंगलनाथ मंदिराच्या पाठीमागील परिसरात सापळा लावला. यावेळी मोठ्या शिताफीने इम्रान जबी पठाण ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी लोखंडी पिस्टल, कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल मिळून आला.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे, हनुमान खेडकर, विकास राठोड, दीपक खांडेकर, तुषार गायकवाड, बाळू सानप, देविदास जमदाडे, अश्विनकुमार सुरवसे, चालक नामदेव उगले यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button