बीड : शिरूरच्या व्यापाऱ्याचा अपघातात मृत्यू | पुढारी

बीड : शिरूरच्या व्यापाऱ्याचा अपघातात मृत्यू

शिरूर कासार : पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील भाळवणीजवळ झालेल्या बस, ट्रॅक्टर व चारचाकी वाहनाच्या तिहेरी अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये सचिन मंडलेचा (वय ३५, मूळ रा. टाकळी मानूर, सध्या रा. शिरूर ) या व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी मुंबईवरून माल खरेदी करून सचिन परत येत होते. यावेळी झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत आणखी दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन मंडलेचा यांच्या पश्चात दोन जुळ्या मुली, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूवर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

Back to top button