Hingoli: मुरुंबा येथील तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीवन संपविले | पुढारी

Hingoli: मुरुंबा येथील तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीवन संपविले

गिरगाव: पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील मुरुंबा येथील एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले जीवन संपविले. ही घटना आज (दि.२२) सकाळी उघडकीस आली. ज्ञानेश्वर संभाजी वारे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. Hingoli

याबाबत आधिक माहिती अशी की, वसमत ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे मुरुंबा येथील ज्ञानेश्वर शनिवारी (दि. २१) रात्रीपासून घरी आला नव्हता. घरच्यांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रांनी देखील शोधाशोध केली. पण त्याचा ठावठिकाणी लागला नाही, त्याचा मोबाईलही बंद लागत होता. आज सकाळी ज्ञानेश्वरीचा चुलत भाऊ शेतात गेला असता ज्ञानेश्वरचा मृतदेह आढळला. त्यानंतर गावातील नागरिकांनी शेतात धाव घेतली. याची माहिती वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली. Hingoli

सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे आणि त्यांचे पथक घटना स्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करताना ज्ञानेश्वर याच्या खिशात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण जीवन संपवत असल्याची चिठ्ठी आढळून आली. महसूल प्रशासनाच्या वतीने मंडल अधिकारी प्रियंका खडसे, तलाठी भालेराव घटनास्थळी दाखल झाले.

पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार अविनाश राठोड करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button