Beed News : अंबाजोगाईत कोयताधारी चोरट्यांचा धुमाकूळ : नागरिकांत घबराटीचे वातावरण | पुढारी

Beed News : अंबाजोगाईत कोयताधारी चोरट्यांचा धुमाकूळ : नागरिकांत घबराटीचे वातावरण

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : कोयताधारी चोरट्यांनी अंबाजोगाई शहरात धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये  घबराटीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री ताहेर पान सेंटरसह काही किराणा दुकाने फोडून चोरट्यांनी हजारोंचा माल लंपास केला. सततच्या या घटनांमुळे नागरिक भीतीचे छायेखाली वावरत आहेत. Beed News

आठ दिवसांपूर्वी अंबाजोगाई ते गित्ता रोडवर माजी सरपंच अनिल शिंदे यांच्या घरात कोयताधारी पाच ते सहा चोरटे शिरले होते. मात्र, शिंदेंनी आतील दरवाजा न उघडल्याने चोरी झाली नाही आणि तेही सुरक्षित राहिले. मात्र, आठ दिवसांच्या खंडानंतर पाच ते सहा कोयताधारी चोरटे शहरालागत असणाऱ्या मिल्लत नगर भागात घुसल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. मिल्ल्त नगर भागात चोरटे शिरल्याची माहिती रहिवाशी मेंहदी खान पठाण यांना फोन करून नागरिकांनी सांगताच ते आपल्या मुलासह रस्त्यावर आले. चोरट्यांच्या लक्षात येताच चोरटे बंद घरात जाऊन लपले. काही तास तिथेच थांबले. चोरटे पळून गेले असावेत, म्हणून सर्व नागरिक घरात गेल्यानंतर चोरट्यांनी बंद घरातून पोबारा केल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले. मात्र, त्यांना कोणीही पकडू शकले नाही. Beed News

पुन्हा चोरट्यांनी बस स्टँड समोर असणारे ताहेरपान सेंटरचा वरचा पत्रा काढून आत घुसून साहित्य व नगद मिळून ५० हजारांची चोरी केली. त्या आधी हनुमाननगर जवळील भागातील काही किराणा दुकाने चोरट्यांनी फोडल्याचे समजते. विशेष म्हणजे अंबाजोगाई शहराच्या जवळच असणाऱ्या मौलाली दर्गा रोडवर चोरट्यांनी काही रिकामी खोके व साहित्य फेकून दिल्याचे समजते.

हेही वाचा 

Back to top button