Beed : माजलगावच्या गावखेड्यात ५ दिवसांपासून बिबट्याची ‘दहशत’, २० बकऱ्या फस्त  | पुढारी

Beed : माजलगावच्या गावखेड्यात ५ दिवसांपासून बिबट्याची ‘दहशत’, २० बकऱ्या फस्त 

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या तब्बल ६ गावखेड्यात गेल्या पाच दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ माजवला आहे. दरम्यान बिबट्याचा गावागावात थरार निर्माण झाला आहे. आज (सोमवार दि.८) रोजी पहाटे रामपिंपळगावात बिबट्याने २० बकऱ्याच्या पिल्ल्यांसह मोठ्या बकऱ्या फस्त केल्या आहेत. वनविभागच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सकाळीच धाव घेत परिसरात बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान बिबट्याच्या अस्तित्वाने दहशत पसरली आहे. वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. (Beed)

Beed : २० बकऱ्यां केल्या फस्त

 माजलगाव तालुक्यातील मंगरूळ नं. १, हरकी लिमगाव, मंगरूळ नं. २, राम पिंपळगाव, सावरगाव, खेर्डा यासह ईतर गावाच्या शिवारात बिबट्या आढळून आला असल्याचा दावा स्थानिक गावातील नागरिक गेल्या ५ दिवसांपासून करत होते. मंगरूळ येथे शेतातील वगारु (म्हैस)वरही हल्ला केला होता. परंतु वनविभागाने यावर तात्काळ पाऊले उचलली नाहीत, परिणामी वनविभागाच्या निष्काळजीपणाचा फटका सोमवार (दि.८) रोजी रामपिंपळगाव येथे बसला. बिबट्याने याठिकाणी शेतकरी सय्यद रहेमोद्दीन बडेमिया यांच्या गोठ्यातील बकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात २० बकऱ्या मरण पावल्या आहेत. त्यामुळे सर्वगावात बिबट्याची दशहत निर्माण झाली असून लहान मुले घाबरून गेली आहेत. शाळेत जाण्यासाठी किंवा खेळण्यासाठीही ते घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान गेल्या पाच दिवसात बिबट्या तब्बल ८ ते १० लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी दिसला असल्याचा दावा स्थानिक लोकांकडून होत होता. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी, चित्ते, पाईक, मसुले, केंद्रे, डी.एस.मोरे वनपाल वडवणी, आर.सी.देवकांबळे, पारखे वाहनचालक सिद्धेश्वर चव्हाण यांनी परिसरात बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा 

Back to top button