

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: औंढा रोडवरील कौठा टी पॉइंटवर विनपरवाना बेकायदेशीर अवैध दारू विक्रीसाठी नेत असताना आरोपीला पकडले. आरोपीजवळून ७५००रुपयाचे रॉयल स्टॅगच्या ३० बॉटल तसेच ९२०० रुपये किंमतीच्या मॅकडॉलनं १ लेबल असलेल्या ४६ बॉटल आणि दोनचाकी मोटारसायकल मुद्देमालासह ९६ हजार ७०० रुपये किमतीचा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. औंढामार्गे असलेल्या कौठा टी पॉईंटवर एक व्यक्ती विनापरवाना बेकायदेशीर अवैध दारूचासाठा दोनचाकी वाहनातून पार्सल करून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यावरून पोलिस अधीक्षक साहेब, उपविभागीय पो.अधीकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे साहेब, मुस्लिओद्दीन म. मुबसरोद्दीन सिद्दीकी, अविनाश राठोड यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी वसमत तालुक्यातील कौठा टी पॉइंटनवर दोनचाकी वाहन अडविले. आरोपीजवळ विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्यासाठी अवैध दारू विक्रीसाठी नायलॉन पोत्यात असलेल्या ७५०० रुपयाचे रॉयल स्टॅगच्या ३० बॉटल तसेच ९२०० रुपये किमतीच्या मॅकडॉलनं १ लेबल असलेल्या ४६ बॉटल आणि मोटारसायकल अश्या मुद्देमालासह एकूण ९६ हजार ७०० रुपये किमतीच्या मालासह आरोपीला पकडण्यात यश आले असून आरोपीला ताब्यात घेतले.
याप्रकरणी मुस्लिओद्दीन म. मुबसरोद्दीन सिद्दीकी, यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिनाथ तुकाराम जाधव रा. चोंडी आंबा यांच्यावर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. जमादार राठोड तपास करीत आहेत.