ठाणे : अल्पावधित लोकप्रिय झालेली वंदे भारत ट्रेनची सुधारित आवृत्ती वंदे भारत स्लीपर ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत फेब्रु. २०२४ पर्यंत भारतीय रेल्वे ताफ्यात दाखल होणार आहे. सर्वप्रथम १५ फेब्रुवारी २०१९ रोजी वंदे भारत ट्रेनला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली से वाराणशी या मार्गावर झेंडा दाखवला.
सामान्य प्रवाशांना या सेवेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने या गाडीच्या डब्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या नव्याने डिझाईन केलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची ८५७ आसन क्षमता (शयनायन कक्ष) असून त्यातील ८२३ प्रवाशांसाठी तर ३४ स्टाफ कर्मचाऱ्यांसाठी असतील तसेच प्रत्येक डब्यात स्वतंत्र खानपान सेवा कक्ष असणार आहे. गाडीस १६ डबे असतील, गाडीची वेग मर्यादा ताशी १६० किमी. आहे. डब्यातील लाकडी कलाकुसरी आरामदायी आसने तसेच प्रवाशाना प्रवासक्षम सुखद अशा लाईटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याखेरिज प्रत्येक इव्यात प्रशस्त तीन प्रस धनगृह, बेसिन न अशा सुविधाही आहेत. सुधारित वंदे भारत ट्रेनचे उत्पादन इंटिग्रल कोच फॅक्टरी आणि भारत अर्थमुव्हर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. या सुधारित वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून सर्वसामान्य प्रवाशांना अगदी रात्री सुद्धा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करता येणार आहे.
आत्मनिर्भर भारत, प्रगती पथावरील भारत या वाटचालीतून निर्मित केलेल्या ट्रेनची वेगवान, सुरक्षितता आणि सेवा ही खास वैशिष्ट्ये आहेत. या गाडीची जडणघडण जागतिक दर्जेदार अशा साधनसामग्रीद्वारे करण्यात आली असून त्यायोगे प्रवाशांना सुखद प्रवास करता येणार आहे. सध्या आयसीएफद्वारे डिझाईन केलेल्या १० गाड्यांचे उत्पादन करण्यात येत आहे. रेल्वेद्वारे अशा २०० गाड्यांचे कंत्राट टीएमएच (रशिया) आरव्हीएनएल आणि भेल टिटावर वॅगन यांच्या संयुक्त प्रकल्पांना दिला आहे.