Vande Bharat Express : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’समोर निदर्शने करणार; इम्तियाज जलीलसह एमआयएम कार्यकर्ते संतप्त

Vande Bharat Express : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’समोर निदर्शने करणार; इम्तियाज जलीलसह एमआयएम कार्यकर्ते संतप्त

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वंदे भारत एक्स्प्रेस च्या स्वागताचा कार्यक्रम हा सर्वांचा आहे. पण भाजपचे कार्यकर्ते हा कार्यक्रम आपलाच असल्याचा आव आणत आहेत. आणि पोलीसही त्यांना साथ देत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात उपस्थित न राहता या गाडीसमोर निदर्शने करणार आहोत, असे खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. Vande Bharat Express

खासदार जलील यांचे रेल्वे स्थानकावर आगमन होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदी आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर को पायलट कल्पना घनावत ही छत्रपती संभाजीनगर शहराची कन्या असून ती वंदे भारत गाडीचे सारथ्य करत आहे. त्यामुळे तिचे स्वागत करण्यासाठी एमआयएमचे पदाधिकारी आले होते. पण त्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले. पोलीसही भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागले, असा आरोप जलील यांनी यावेळी केला. Vande Bharat Express

दरम्यान, खासदार जलील यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. त्यावेळी हा कार्यक्रम सार्वजनिक होता. भाजप कार्यकर्त्यांचे हे कृत्य चुकीचे असल्याचे ते म्हणाले, असे जलील यांनी सांगितले.

हा विकासाचा कार्यक्रम असताना भाजपने पक्षाचा कार्यक्रम असल्याचे प्रदर्शन केले आहे. याला आमचा विरोध असून मुंबई पर्यंत वंदे भारत गाडीला कोठेही रोखून निषेध व्यक्त करणार आहे. यासाठी आमचे कार्यकर्ते मनमाडकडे रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news