परभणी: मराठा आरक्षणासाठी ९ गावातील भजनी मंडळांची १६ किमीची पायी दिंडी | पुढारी

परभणी: मराठा आरक्षणासाठी ९ गावातील भजनी मंडळांची १६ किमीची पायी दिंडी

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : ‘मराठा आरक्षणाची वारी शासनाच्या दारी’, अशी टाळ मृदंगाचा गजरात तब्बल १६ किलो मीटरची पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत जिंतूर तालुक्यातील पाचेगाव, रेपा, मानधानी, नागणगाव, आडगाव, वसा, दौडगाव, बोर्डी, भोगाव पुंगळा गावातील भजनी मंडळी सहभागी झाले होते. यानंतर तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात जवळपास ३० ते ३५ गावात साखळी उपोषण चालू आहे. तर राजकीय नेत्यांना गावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भजनी मंडळांनी एकत्र येऊन टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढली. यावेळी दिलेल्या निवेदनात मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ५० लाखांची मदत द्यावी. तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button