छत्रपती संभाजीनगर : ठेचा भाकर खाऊन कोविड योद्ध्यांची दिवाळी | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : ठेचा भाकर खाऊन कोविड योद्ध्यांची दिवाळी

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : कथित कंत्राटी कामगार कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी आज (दि.११) आंदोलन करण्यात आले. संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरएमओ कार्यालयासमोर बसून कामगारांनी ठेचा भाकरी खाऊन शासनाचे लक्ष वेधले.

कोविड महामारीच्या दोन्हीही लाटेत कामगारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मोठी कामगिरी पार पाडली आहे. त्यामुळे आम्हाला शासकीय सेवेते सामावून घ्या. सध्या घाटी रूग्णालयामध्ये सुमारे १ हजार चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची आवश्यकता आहे. याचा विचार करून कामगारांना सेवेत घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी अॅड. अभय टाकसाळ, अभिजीत बनसोडे, आतिश दांडगे, गौतम शिरसाठ, श्रीयोग वाघमारे, निलेश देवकर, दीपक मगर, अमित भालेराव, सुशील कांबळे, संतोष बिरारे, सय्यद आरिफ, विजय नागोबा, आनंद सुरडकर, सिद्धार्थ नरवडे, दिनेश साळवे, दीपक जाधव, आनंद पर्घने, नंदा हिवराळे, विद्या हिवराळे, उषा भिंगारे, मनीषा हिवराळे, दीपिका पंडित, ज्योती खरात, वनिता जाधव, आम्रपाली जोगदंड, मनीषा हिवराळे, सविता घागरे, नूतन शेजुळ, उषा कांबळे, उषा साबळे, रेशमा सय्यद, पूजा बोध, उज्वला वाघमारे, मनिषा सातपुते, सोनाबाई हजारे, विद्या इंगळे, संध्या साळवे, वंदना भालेराव, वंदना बोर्डे यांनी ठेचा -भाकरी खाऊन सहभाग नोंदवला.

हेही वाचा 

Back to top button