वैजापूर, पुढारी वृत्तसेवा: मराठा समाजाला ओबीसी आरक्षण न मिळाल्याने एका 20 वर्षीय युवकाने आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.४) सकाळी भग्गाव येथे उघडकीस आली.
कृष्णा दत्तू जगताप असे मृत युवकाचे नाव आहे. कृष्णाजवळ चिठ्ठी मिळून आली आहे. यात त्याने आरक्षण न मिळाल्याने जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.
हेही वाचा