छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद, नोकरदार, विद्यार्थ्यांची गैरसोय
पैठण : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. याचा शासकीय कार्यालयासह शाळा, महाविद्यालयावर मोठा परिणाम झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने शहर व ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांनी काही ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करून मोठी नुकसान केले आहे. त्यामुळे रविवारी दुपारी पोलीस विभागाच्या सूचनेनुसार महामंडळाने बससेवा अचानक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, आज (दि. ३०) सकाळी पैंठण बस स्थानकावर शुकशुकाट दिसून आला. बससेवा बंद असल्याने तहसील, पंचायत समिती, नगरपरिषद, भूमी अभिलेख, पाटबंधारे विभाग, दुय्यम निबंधक, सार्वजनिक बांधकाम, बाल प्रकल्प या शासकीय कार्यालयातील कर्मचारी व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे विविध शासकीय कार्यालयातील कामकाज आज ठप्प झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा

