मराठा आरक्षण आंदोलन : सोलापूर-धुळे महामार्गावर रास्‍तारोको; बीड-कल्‍याण बस फोडली | पुढारी

मराठा आरक्षण आंदोलन : सोलापूर-धुळे महामार्गावर रास्‍तारोको; बीड-कल्‍याण बस फोडली

बीड : पुढारी वृत्‍तसेवा मराठा आरक्षण प्रश्नावर आता आक्रमक आंदोलन केले जात आहे. बीड शहरानजीक सोलापूर-धुळे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. नगर रोड भागात बीड-कल्याण ही बसही आंदोलकांनी फोडली.

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण प्रश्नावर साखळी उपोषण, कँडल मार्च असे आंदोलन केले जात आहे. मराठा आंदोलनाला याला आक्रमक रुप येत आहे. बीड शहरानजीक सोलापूर-धुळे महामार्गावर महालक्ष्मी चौकात रास्तारोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे, तर एसटी महामंडळाच्या बसेसलाही लक्ष केले जात आहे. यामुळे एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button