Ravikant Tupkar : लातुरात रविकांत तुपकरांची बैठक मराठा युवकांनी उधळली | पुढारी

Ravikant Tupkar : लातुरात रविकांत तुपकरांची बैठक मराठा युवकांनी उधळली

लातूर, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची बैठक येथील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.२८) सकाळी उधळून लावली. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांना त्यांच्या सभा बैठका घेऊ देणार नाही, असे त्यांनी बजावले. Ravikant Tupkar

आज सकाळी येथील औसा रस्त्यावरील विश्रांतीगृहामध्ये तुपकर यांची बैठक होती. त्याची तयारी सुरू असताना मराठा समाजाचे युवक येथे जमले. ‘एक मराठा लाख मराठा’, अशा घोषणा देत त्यांनी त्यांच्या सूटमध्ये प्रवेश केला. राजकीय पुढार्‍यांना बंदी केली असताना तुम्ही बैठकीसाठी लातुरात आलाच कसे ? असा सवाल केला. Ravikant Tupkar

लातूरच काय पण महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षाची सभा, बैठक आम्ही होऊ देणार नाही, तुम्ही परत जा, असे त्यांनी बजावले. यावेळी तुपकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमच्याही पक्षाची भूमिका असून आम्ही मराठा समाजासोबत आहोत, असे सांगितले. यानंतर तुपकर येथून बाहेर पडले. त्यानंतरच आंदोलन शांत झाले. दरम्यान या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार होती, तीही रद्द करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button