जालना : मराठा आरक्षणप्रश्‍नी मनोज जरांगे-पाटील यांचे बेमुदत उपोषण पुन्हा सुरू

जालना : मराठा आरक्षणप्रश्‍नी मनोज जरांगे-पाटील यांचे बेमुदत उपोषण पुन्हा सुरू

जालना, पुढारी ऑनलाईन:  मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा सन्मान करून मराठा आरक्षणप्रश्‍नी निर्णय घेण्‍यासाठी राज्‍य सरकारला ४० दिवसांची दिले होते. आज ४१ दिवस झाले आहेत. सरकारने मराठा आरक्षणावर कोणतीच हालचाल न केल्‍याने स्‍थगित केलेलं बेमुदत उपाेषण आजपासून (दि.२५) पुन्हा सुरू करत आहे,अशी घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी केली. यावेळी अन्न, पाणी, वैद्यकीय उपचार घेणार नाही, असेही त्‍यांनी जाहीर केले.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसात मागे घेतो, असे आश्‍वासन राज्‍य सरकारने दिले होते. आता या आश्‍वासनाला ४० दिवस उलटून गेले तरीही गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. त्‍यामुळे सरकारला दिलेला अल्‍टिमेटम पूर्ण झाला आहे. सरकार आमच्या समाजाची दिशाभूल करतंय हे स्‍पष्‍ट होतंय म्‍हणत जरांगे यांनी आजपासून पुन्हा आंतरवाली सराटीतून आमरण उपोषणाला सुरूवात केली.

 शांततेत आंदोलन करण्याचं जरांगे-पाटील यांचे आवाहन

आरक्षणासाठी कोणीही जीवन संपवू नका. गावात कोणी नेता आला तर त्‍यांना शांततेने माघारी पाठवा, मराठा बांधवांनी आरक्षण प्रश्‍नी सूरु असलेले आंदाेलन शांततेत करावे, असे आवाहन करत  आपण आरक्षणाची लढाई जिंकू, असा विश्वासही यावेळी जरांगे-पाटील यांनी व्यक्‍त केला. मराठा आरक्षण घेतल्‍याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धारही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. सरकारला दिलेली मुदत संपली, आता थांबणार नाही. मराठ्यांना सरसरकट कुणबी प्रमाणपत्र द्‍या, मराठा आरक्षण प्रश्‍नी जीवन संपवलेल्‍या बांधवांच्या कुटुंबियांना सरकारने मदत जाहीर करावी, अशा मागण्‍याही त्‍यांनी यावेळी केल्‍या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news