...तर पुढील आंदोलन सरकारला पेलणार नाही : मनोज जरांगे | पुढारी

...तर पुढील आंदोलन सरकारला पेलणार नाही : मनोज जरांगे

नेकनूर; पुढारी वृत्तसेवा : येत्या २२ तारखेपर्यंत सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाहीतर पुढचे आंदोलन मोठ्या प्रमाणात असणार असून ते सरकारला पेलणार नाही. मराठा समाजाच्या मागणीकडे डोळेझाक न करता निर्णय घ्यावा नाहीतर याचे मोठे परिणाम होतील असा इशारा नेकनूरजवळील सफेपूर फाट्यावर आयोजित दुसऱ्या टप्प्यातील संवाद समारोप सभेत मनोज जरांगे यांनी दिला. रात्री एक वाजता झालेल्या या सभेत महिलांची मोठी उपस्थिती होती.

संबंधित बातम्या 

बालाघाटवर शनिवारी (दि. २१) रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे यांचे आगमन झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित समाज बांधवाना त्यांनी आवाहन केली आणि सांगितले की, घरोघरी जाऊन आरक्षणाचे महत्त्व सांगावे लागेल. सर्वांनी या लढाईत योगदान द्यावे, शांततेत आंदोलन करून आरक्षण मिळवायचे आहे?, कुठेही गालबोट लागणार नाही? याची दक्षता बाळगा. सरकार माझी कुठे चूक होते काय याची वाट पाहत आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पुरावे असताना सरकार चालढकल करीत असून २२ तारखेनंतर सरकारला आंदोलन पेलणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच पुढील आंदोलनाची दिशा लवकर सांगण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मांजरसुबा रोडवरील सफेपूर फाट्यावर चाळीस एक्कर शेतात आयोजित मनोज जरांगे यांच्या ९ वाजता आयोजित संवाद सभे पार पडली. या सभेसाठी पाच वाजल्यापासून लोकं जमायला सुरवात झाली होती. गावागावातून वाहने सभास्थळी दाखल होत असताना ‘एक मराठा लाख मराठा’ ने परिसर दणाणून सोडला. परिसरातील बहुतांश गावांनी चार दिवसापासून यासाठी परिश्रम घेतले. उशिरापर्यंत महिलाची उपस्थिती कायम होती. अनेक ठिकाणी चहा, नाश्त्याची सोय करण्यात आली. मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक रस्त्यावर उतरले होते.

Back to top button