

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जातनिहाय जनगणना करा, जे निरीक्षण असेल, ते आम्हाला मान्य असेल, असे आवाहन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले. हिंगोली येथे आयोजित एल्गार सभेत ते आज (दि.२६) बोलत होते. Chhagan Bhujbal
भुजबळ पुढे म्हणाले की, मोडायला, तोडायला, पेटवायला अक्कल लागत नाही, तर जोडायला अक्कल लागते. आमचे केस उगाच नाही पांढरे झाले, जेवढी केस पांढरी झाले आहेत, तेवढी आंदोलने केली आहेत. आमची एक सभा होत आहे, तुमच्या जास्त सभा होत आहेत. या सभांमधून मला गलिच्छ शिव्या दिल्या जात आहेत. जाळपोळ कऱणारे दुसरेच, आरोप मात्र आमच्यावर होत आहे, असा दावा यावेळी छगन भुजबळ यांनी केला. Chhagan Bhujbal
दोन समाजात तेढ निर्माण करू नका, दोन समाजात दरी निर्माण करू नका.मराठा समाजातील गरिबांना आमचा विरोध नाही. मराठ्य़ांना विरोध नाही, पण आमचा जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे.
मराठा समाजातील १८ टक्के आयएएस अधिकारी आहेत. तर २८ टक्के आयपीएस अधिकरी आहेत. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ ८५ टक्के मराठ्यांनी घेतला आहे. त्यामुळे ज्या योजना, निधी सारथीला दिल्या आहेत. त्या महाज्योती आणि ओबीसी समाजाला मिळायला हव्यात,अशी मागणी भुजबळ यांनी यावेळी केली.
हेही वाचा