जालना : आष्टी माजलगाव रस्त्यावर टेम्पोची मोटारसायकलला धडक; तरुण गंभीर जखमी | पुढारी

जालना : आष्टी माजलगाव रस्त्यावर टेम्पोची मोटारसायकलला धडक; तरुण गंभीर जखमी

आष्टी; पुढारी वृत्तसेवा : परतुर माजलगाव रस्त्यावर कणकवाडी तांड्याजवळ टेम्पोची मोटारसायकलचा रविवारी (दि. १०) सायंकाळच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला. यात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला जालना येथे हलविण्यात आले आहे.

रविवारी (दि. १०) बाळू नामदेव राठोड (वय 29 रा. कोकाटे हादगाव तांडा) हे मोटारसायकलवरुन माजलगावकडे जात होते. यावेळी कणकवाडी तांड्याजवळील पेट्रोल पंपाजवळ माजलगाववरून आष्टीकडे येत असलेल्या टेम्पोने (क्र. एम एच 42 एम 4194) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार बाळू राठोड हा तरुण गंभीर जखमी झाला.

या अपघाताची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच त्या ठिकाणी तात्काळ पोलीस जमादार भिमराव राठोड बरले राहुल वाघमारे यांना पाठवले पोलीसांनी जखमी ला तात्काळ मदत करत आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले त्या ठिकाणी प्रथमोपचार करून गंभीर जखमी असलेल्या बाळु राठोड यास जालना येथे पाठविण्यात आले दरम्यान अपघात घडताच पिक अप चालक घटनास्थळा वरून पसार झाला असून पोलीसांनी दोन्ही वाहने आष्टी पोलीस ठाण्यात लावली आहेत.

Back to top button