परभणी : मानवत येथील अमृत कलश यात्रेस मोठा प्रतिसाद | पुढारी

परभणी : मानवत येथील अमृत कलश यात्रेस मोठा प्रतिसाद

मानवत; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय पर्वानिमित्त मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा उपक्रम होत आहे. यानिमित्त नगरपालिकेच्या वतीने आज (दि.२२) शहरातून काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला .

अमृत कलश यात्रेची सुरुवात नगरपालिका कार्यालय येथून ढोल ताशा पथक व देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून झाली. यावेळी नेताजी शाळेतील स्कॉउड गाईड पथक तसेच नगरपरिषद कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेऊन अमृत कलश यात्रेला सुरुवात केली. या अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कलशामध्ये मातीचे संकलन करण्यात आले.

यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे म्हणाल्या, की नगरपरिषदेच्या वतीने संकलित करण्यात आलेली माती दिल्ली येथे शहिदांच्या स्मरणार्थ अमृतवाटिका तयार करण्याकरिता पाठविण्यात येणार आहे. या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता व एकात्मता तसेच भारतीय संस्कृती याचे दर्शन होईल. कलश यात्रेच्या यशस्वीतेसाठी पालिकेचे कर्मचारी भगवान शिंदे, एकनाथ जाधव, मंगेश खोडवे, अमोल तांदळे, हनुमंत बिडवे, राजेश शर्मा, भगवान बारटक्के, संजय रुद्रवार, दीपक सातभाई, रावसाहेब झोडपे, पंकज पवार, शेख वसीम, रितेश भदर्गे , सचिन सोनवणे, बाळू लाड, मुंजा डोळसे, बळीराम दहे,संजय कुऱ्हाडे, नारायण व्यवहारे, सुनील कीर्तने, दीपक भदरगे, इत्यादी कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. ही अमृत कलश यात्रा यशस्वीरित्या पार पडली.

हेही वाचा : 

Back to top button