जालना : घुंगर्डे हादगाव ग्रामपंचायत ठराव सर्व राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

जालना : घुंगर्डे हादगाव ग्रामपंचायत ठराव सर्व राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

शहागड (जालना) : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाने ७ सप्टेंबर रोजी ठराव संमत करण्यात आला. सर्व राजकीय पुढारी व सर्व राजकीय पक्षांना गाव बंदी करण्यात आली. मराठा आरक्षण आंदोलनाची धग अजुनही कायम आहे. सरकारच्या निर्णयाला विलंब होत असल्याने आता आंदोलनाची धार तीव्र होत आहे. मराठा आरक्षणासाठी ग्रामीण भाग एक वाटला असून, अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून सर्वच राजकीय पुढार्‍यांना गाव बंदी करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्यात येणार आहे. असा ठराव घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे चालू असलेल्या आमरण उपोषण मराठा आंदोलकावर लाठीहल्ला व गोळीबार करण्यात आला. याच्या निषेधार्थ हा ठराव घेण्यात आला आहे. अत्यंत शांततेत हे आंदोलन चालू असताना शासनाकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. दिनांक ७ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या ठरावात असे नमूद करण्यात आले आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत र्व राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्यात येणार आहे.

गावामध्ये मतदान मागण्यासाठी, राजकीय सभेसाठी, राजकीय उद्घाटनासाठी गावात येऊ नये अशा पद्धतीचा ठराव घुंगर्डे हादगाव ग्रामपंचायत कार्यालयाकडून एकमताने घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंगटे, अनिल मस्के, विशाल पवार, ज्ञानेश्वर मस्के, सचिन चोरमले, आधी ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत. यावेळी गावकरी बंडु शिंगटे, बाबासाहेब मस्के, संतोष धावडे, गणेश फिसके, कांता शिंदे, मनोज खापरे, गणेश मस्के, गजु मस्के, समाधान मस्के, भागवत महाराज दोबाले, नितीन शिंदे, शिवाजी चोरमले, संजाब खापरे, आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news