बीड जिल्हा दुष्काळी जाहीर करा, सरसकट सर्व पिकांना विम्यासह अनुदान द्या : संभाजी सेना मराठवाडा | पुढारी

बीड जिल्हा दुष्काळी जाहीर करा, सरसकट सर्व पिकांना विम्यासह अनुदान द्या : संभाजी सेना मराठवाडा

सिरसाळा; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यामध्ये पावसाची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण पीक हातातून गेल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्याचबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. यावर शासनाने लवकरात लवकर उपयोजना करून बळीराजाला यातून धीर येण्यासाठी सरसकट बीड जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, सर्वच पिकांना विमा द्यावा व सरकारने हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी आज (दि. ४) संभाजी सेना मराठवाडा अध्यक्ष कृष्णा देशमुख यांच्या नेतृत्वात सिरसाळा येथे मुख्य रस्ता तब्बल २ तास रोखुन शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

गेली ३ महिने झाले तरीही मोठ्या पावसाची अपेक्षा संपलेली नाही. सोयाबीन, कापूस, मूग, तूर, ऊस, पिकासह सर्वच पीक आता करपू लागले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आशा परिस्थितून शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम सरकारने करावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. त्याच बरोबर लवकरात लवकर निर्णय घेऊन किमान सावकार, बँकांकडून कर्ज स्वरूपात घेतलेले पैसे तरी परत मिळावे यासाठी सरकारने लवकरात लवकर अनुदान व विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावा अशी मागणी केली आहे.

या आंदोलनात प्रा. चिलपिंपरे सर, प्रा. दत्तात्रय मोर, कॉम्रेड बडे सर, कृष्णा देशमुख व रिपब्लिकन चे पोटभरे यांनी मार्गदर्शन केले,आंदोलन यशस्वी करण्यासाठी लखन गायकवाड,अर्जुन काळे,गोविंद देशमुख, शंकर खरात आबा कोल्हे गणेश चोरमले, माऊली हांडे, माऊली पौळ, विष्णू पतंगे, मदन वाघमारे,शेरकर,श्रीराम नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष बीड श्रीराम शिंदे, वडवणी तालुका अध्यक्ष शरद देशमुख, जयदीप भैय्या देशमुख रमेश पाटील संतोष, विखे पाटील संतोष, ईके पाटील पाटील,यांचा सह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते

Back to top button