बीड : पोलिसांच्या सतर्कतेने बँक ऑफ महाराष्‍ट्रच्या एटीएमची रक्‍कम वाचली | पुढारी

बीड : पोलिसांच्या सतर्कतेने बँक ऑफ महाराष्‍ट्रच्या एटीएमची रक्‍कम वाचली

नेकनूर ; पुढारी वृत्‍तसेवा मांजरसुंबा-केज रस्त्यावरील नेकनूरपासून जवळ असलेल्या येळंबघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या समोरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून झाला. हा चोरीचा प्रकार आज (बुधवार) पहाटे तीन वाजता घडला. यावेळी नेकनूर पोलिसांनी विलंब न करता धाव घेतल्याने एटीएम मधील मोठी रक्कम वाचली.

बँक ऑफ महाराष्ट्र येळंबघाट शाखेचे अहमदनगर-लातूर मार्गावरील प्रवाशांसाठी रात्री सुरू असलेले एटीएम मशीन उपयुक्त ठरते. (बुधवारी) पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. याची सूचना एटीएमच्या माध्यमातूनच एटीएम कंट्रोलला गेली. यानंतर नेकनूर पोलिसांना माहिती दिली गेली.

या कालावधीत मशीनची मोठ्या प्रमाणात फोडाफोड केली गेली, मात्र चोरट्यांच्या हाती रक्कम लागण्यापूर्वीच पोलीस कॉन्स्टेबल विशाल क्षीरसागर, सुखदेव बांगर यांनी धाव घेतली. या पाठोपाठ एपीआय विलास हजारे, उपनिरीक्षक गुट्टेवार देखील या ठिकाणी पोहोचले. पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपींनी पळ काढला, मात्र लाखोंची रक्कम वाचली. ती केवळ पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच धाव घेतल्याने एटीएम मधील रक्‍कम वाचली. नाहीतर नुकतीच कळंब येथे घडलेल्‍या घटनेची पुनरावृत्ती झाली असती.

हेही वाचा : 

Back to top button