Parbhani Maratha Andolan : जालना घटनेच्या निषेधार्ध गंगाखेडमध्ये भर पावसात ठिय्या | पुढारी

Parbhani Maratha Andolan : जालना घटनेच्या निषेधार्ध गंगाखेडमध्ये भर पावसात ठिय्या

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज घटनेचा व राज्य सरकारचा निषेधार्थ सोमवारी (दि.४) कडकडीत बंद पाळण्यात आला. अजय भिसे यांनी नगरपालिकेच्या पाण्याच्या जलकुंभावर चढून तीव्र निषेध व्यक्त करत राज्य सरकार विरोधी घोषणा दिल्या. (Parbhani Maratha Andolan)

मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (दि.४) गंगाखेड शहर बंदची हाक देण्यात आली होती. व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून बंदला पाठिंबा दिला. मराठा समाजासह इतर प्रत्येक समाजातील लोकप्रतिनिधी, पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिकांनी हजेरी लावली होती. (Parbhani Maratha Andolan)

परळी नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तहसील परिसर, जायकवाडी परिसर, नवा मोंढा परिसर, दत्त मंदिर परिसर, भगवती चौक परिसर, बस स्थानक परिसर, रेल्वे स्थानक परिसर, गोदाकाठ परिसर आदींसह सर्व छोट्या मोठ्या गल्लीबोळातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. भव्य निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी जि.प.सदस्य प्रल्हाद मुरकुटे, संदीप अळनुरे, राष्ट्रवादीचे युवा नेते मिथिलेश केंद्रे, बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस, श्रीकांत भोसले, बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, पंचायत समितीचे माजी सदस्य जानकीराम पवार शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अनिल सातपुते, रनधीरराजे भालेराव, गिरीश सोळंके, रजत गायकवाड, शेख मुस्तफा आदींसह हजारो आंदोलक यावेळी सहभागी झाले होते.

Parbhani Maratha Andolan : भर पावसात ठिय्या आंदोलन

आज सकाळी काही वेळ पावसाने हजेरी लावली. मात्र, आंदोलक पावसाला झुगारून उस्फूर्तपणे शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकार विरोधी घोषणा देऊन पोलीस यंत्रणेच्या कारवाईचा जाहीर निषेध व्यक्त केला.

अजय भिसेंकडून जलकुंभावर ‘शोले स्टाईल’ आंदोलन

अजय भिसे यांनी थेट नगर पालिकेच्या जलकुंभाचा आधार घेतला. जलकुंभावर चढून राज्य सरकार विरोधी घोषणा देत व पोलिसांचा ‘शोले स्टाईल’ आंदोलन करून निषेध व्यक्त केला. पोलीस यंत्रणेने मोठ्या शिताफीने अजय भिसे यांना खाली उतरविले. डीवायएसपी डॉ. दिलीप टिपरसे व पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा 

Back to top button