छ. संभाजीनगर: सिल्लोड, बनकिन्होळा, कन्नडमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

छ. संभाजीनगर: सिल्लोड, बनकिन्होळा, कन्नडमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिल्लोड: पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला सर्व समाजाच्या नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी आज (दि.४) उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

निवृत्त प्राचार्य एन. बी. चापे, डॉ. निलेश मिरकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.

सिल्लोड बंदच्या आंदोलनप्रसंगी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील उपसरपंच अनिल बनकर यांनी दुचाकी पेटवून घटनेचा निषेध केला. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

बनकिन्होळा येथे बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, भायगाव, बाभूळगाव बु.,वरखेडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार (दि.४ ) बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी सर्वच व्यापार्‍यांनी दिवसभर आपली आस्थापणे बंद ठेवून बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मुख्य बस स्थानक परिसरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी गहेणाजी पाटील, रामा फुके, भागीनाथ पाटील, हादी चाऊस, सोनल जैस्वाल, गजानन फरकाडे, एकनाथ फरकाडे, प्रभु पाटील, रामदास फरकाडे, संजय दामले, सचिन जाधव, योगेश फरकाडे, पांडुरंग फरकाडे, सोमिनाथ फरकाडे, सुरेश जाधव, पवन खुळे, गणेश काकडे, जनार्धन फरकाडे, संतोष फरकाडे, रामनाथ फरकाडे आदीसह उपस्थित होते.

कन्नड शहरात उत्स्फूर्त मोर्चा, ग्रामीण भागात कडकडीत बंद

कन्नड शहरात सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयावर जनआक्रोश निषेध मोर्चा काढला. शिवकन्याच्या हस्ते उपविभागीय अधिकारी  संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देत घटनेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, शहर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news