

नरसीफाटा; पुढारी वृत्तसेवा: मौजे कुंचेली येथे शेतात काम करत असताना रानडुक्कराने एका तरूणावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नांदेड येथे हालविण्यात आले आहे. शेख शाहरूख रमजान साब (रा.कुंचेली) असे जखमी तरूणाचे नाव आहे. प्रशासनाने त्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
नायगाव तालुक्यातील मौजे कुंचेली येथील तरूण शेख शाहरूख शेतात काम करीत होता. यावेळी एक रानडुक्कराने त्याच्यावर हल्ला चढवला. यात त्याच्या डाव्या पायाच्या मांडीला मोठी दुखापत झाली. त्याला नायगावच्या ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. त्यानंतर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी विष्णूपूरी नांदेड येथे हलविण्यात आले. शेख शाहरूख गरीब कुटुंबातील कर्ता तरूण आहे. आई- वडील व तीन बहिणींचे कुटुंब त्याच्यावर अवलंबून असल्याने त्याला आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
हेही वाचा