बीड: परळी वैजनाथ मंदिरात मनमोहक पुष्पसजावट; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

बीड: परळी वैजनाथ मंदिरात मनमोहक पुष्पसजावट; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा: बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथाचे दर्शन घेण्यासाठी आज (दि.२८) दुसर्‍या श्रावण सोमवारी मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या हर हर महादेवच्या जयघोषांनी मंदिर परिसर दणाणून केला होता. मंदिरात मनमोहक पुष्पसजावट करण्यात आली आहे. तर परिसरात भक्तीमय वातावरण होते.

दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे. श्रावणीच्या पर्वकाळात सोमवारी मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मोठ्या संख्येने देशभरातून भाविक दाखल झाले आहेत.

धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानकडून सजावट

श्रावण सोमवारच्या निमित्ताने कृषीमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानने संपूर्ण मंदिरात विविध फुलांची सजावट केली आहे. अत्यंत आकर्षक सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर, गाभाऱ्यात करण्यात आली आहे. आकर्षक सजावटीसाठी झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे २१ प्रकाराच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. मागील वर्षीपासून पवित्र श्रावण महिन्यात प्रत्येक श्रावण सोमवारी व महाशिवरात्रीला नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मंदिरात आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात येते. त्याचबरोबर भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात येते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news