बीड : मोहटा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू | पुढारी

बीड : मोहटा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

शिरूर कासार, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तांगडगांव येथील एक कुटूंब मोहटा देवीच्या दर्शनाला जात असतांना मानूरच्या पुढे साधारण एक किलोमीटर अंतरावर शेंदूरकर यांचे घराजवळ गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून गाडीचा चक्काचूर झाला आहे. शिवाय, अन्य सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बीड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिकची माहिती अशी की,  ऊसतोड मजूर म्हणून काम करत असलेले नाईकनवरे कुटूंब शुक्रवारी मोहटा देवी दर्शनासाठी ईंडीका व्हिस्टा गाडीने जात होते. सकाळी अकराच्या सुमारास भरधाव वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने झाडावर धडकली.  त्यात गाडीचा चक्काचूर झाला.  गाडी चालवत असलेले गोकुळ बापुसाहेब नाईकनवरे (वय ४०) यांचेसह त्यांची आठ महिन्याची भाची दिव्या आदिनाथ मडके (रा. देवी निमगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचंलत का?

Back to top button