हिंगोली: दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे, १६ जणांवर गुन्हा; ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

हिंगोली: दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे, १६ जणांवर गुन्हा; ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी पोलिसांच्या पथकाने कळमकोंडा व घोळवा शिवारात जुगार अड्डयावर टाकलेल्या छाप्यात 6.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 7 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी 16 जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.23) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.

घोळवा शिवारातील एका शेतात टिनपत्रामध्ये तसेच कळमकोंडा शिवारात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक कृष्णा सोनुळे, उपनिरीक्षक इंगळे, जमादार प्रशांत शिंदे, गजानन होळकर, किशोर खिल्लारे, नागोराव होडगिर, शिवाजी देमगुंडे, बाबासाहेब कांबळे, शेकुराव बेले यांची दोन पथके तयार करण्यात आली.

यामध्ये एका पथकाने घोळवा शिवारात तर दुसऱ्या पथकाने कळमकोंडा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकला. घोळवा येथे नऊ जण तर कळमकोंडा येथे सात जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व सुमारे 7 दुचाकी वाहने असा 6.50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक मुंडे यांच्या तक्रारीवरून हनुमान मोरे, विलास तोरकड, सचिन भिसे, संदीप तोरकड, बळीराम भिसे, राघोजी तोरकड (सर्व रा.घोळवा), संतोष शिंदे (आखाडा बाळापूर), उत्तम वाघडव, अनंता खुडे (रा. पार्डी) यांच्यासह एका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर कळमकोंडा येथील प्रकरणात उपनिरीक्षक सोनुळे यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्‍वर कऱ्हाळे, भगवान इंगोले, मंगेश भोकसे, पंजाब शिंदे, विशाल शिंदे, भारत पातोडे, मारोती शिंदे, (सर्व रा. कळमकोंडा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार गजानन होळकर, जमादार सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button