हिंगोली: गोरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कांदा पेटवून आंदोलन | पुढारी

हिंगोली: गोरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कांदा पेटवून आंदोलन

गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा: राज्य सरकारच्या कांदा निर्यात निर्णयाविरोधात गोरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिजाऊ चौक चौफुलीवर आज (दि.२३) आंदोलन केले. यावेळी कांदा रस्त्यावर पेटवून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

राज्यातील शेतकरी मागील पाच सहा वर्षांपासून विविध नैसर्गिक संकटाशी सामना करीत आहे. शेत मालाचे बाजारपेठेत दर कोसळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकताच सरकारने कांदा निर्यातीवर निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. याच्या निषेधार्थ सरकारविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन कावरखे, नामदेव पतंगे, रामेश्वर कावरखे, मदनलाल कावरखे, दशरथ मुळे, गजानन केंद्रेकर, नारायण देव, संतोष वैद्य, अशोक कावरखे, सुरेश गावंडे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button