छत्रपती संभाजीनगर : कांद्याची भाववाढ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : कांद्याची भाववाढ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

पैठण; पुढारी वृत्तसेवा केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हिटलरशाही पद्धतीने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर लावल्याच्या विरोधात पैठण येथे आज (बुधवार) २३ रोजी सकाळी कांदा बाजारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केंद्र शासनाचा निषेध करून आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव नितिन विखे यांना दिले.

केंद्र सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या पिकवलेल्या कांदयाच्या निर्यातीवर ४० टक्के हिटलरशाही पद्धतीने कर लावला आहे. त्‍याच्या निषेधार्थ स्वाभिमान शेतकरी संघटनेचे ज्ञानदेव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी पैठण शहरातील कांदा मार्केट बंद पाडून आंदोलन केले. याप्रसंगी माजी आमदार संजय वाकचौरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष डॉ गुलदाद पठाण, शिवाजी साबळे, इरफान बागवान, शिवाजी साबळे, पवन सिसोदे, संभाजी काटे, रवींद्र आमले, सुभाष नवथर, विजय कुलकर्णी, अंकुश काळे,डॉ बाळासाहेब किलचे, शेख इमाम, भारत नजन, दत्तात्रय लोखण्डे, नागनाथ कारमुडे, मनोज दौड, अमोल औटे, विनोद औटे शिशुपाल औटे, दिलीप बनकर अमोल कर्डीले, उगले, उद्धव मापारी यांच्यासह शेतकरी व्यापारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोनि संजय देशमुख ,पोलीस उप निरक्षक संजय मदने, गोपनीय शाखेचे मनोज वैद्य, अंधारे, शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा : 

Back to top button