रात्रीच्यावेळी गोगलगायीकडून पिकं फस्त; शेतकऱ्याने काढले धक्कादायक व्हिडिओ | पुढारी

रात्रीच्यावेळी गोगलगायीकडून पिकं फस्त; शेतकऱ्याने काढले धक्कादायक व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्‍तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी झाली आहे. आता सोयाबीनचे पीक जोमदार आले होते. मात्र रात्री औरंगाबाद तालुक्यातील रामवाडी या शिवारातील सोयबिन पिकावर गोगलगायींनी विळखा घातला आहे.

शेबी गोगलगायींकडून पिक फस्‍त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गोगलगायी रात्रीतून पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन पिवळे पडत आहे. तर दुसरीकडे पावसाअभावी पिके जळू लागली आहे. त्‍यामूळे शेतकऱ्यांपुढे मोठ संकट निर्माण झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

 .हेही वाचा 

घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन मतदार नोंदणी

नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस, त्र्यंबकेश्वरला १२५ अतिरिक्त फेऱ्या

नाशिक : मेट्रो निओ अनिश्चिततेच्या गर्तेत! डिसेंबरअखेर प्रकल्पाची मुदत संपणार

Back to top button